पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह )नवी दिल्लीत रुम हिटर लावल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत एकाच  कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. सध्या देशातील अनेक भागात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असून दिल्लीतील पीतमपुरा भागात राहत असलेल्या कुटुंबाने थंडी पासून संरक्षण करण्यासाठी रात्री झोपताना रूम हिटर लावला यामुळे शॉर्ट सर्किट होऊन घराने पेट घेतला यात एकाच कुटुंबातील सहा लोकांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.मिळलेल्या महितीनुसार ही घटना दिल्लीच्या पीतमपुरा भागात घडली आहे  एका व्यापाऱ्याच्या घरातील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग काही क्षणात पसरली आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आलं. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग रुम  हिटरमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
  या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *