पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊरमध्ये रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून घरोघरी अक्षता वाटपाचे काम जोमाने सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला होत असून त्यानिमित्ताने अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर(ता.हवेली)येथे चिंचवड देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ थेऊर यांच्या वतीने चिंतामणी मंदिरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी श्री राम विजय राष्ट्र मंदिर इतिहास लढा आणि त्याचे आजचे महत्व याविषयी नीलिमा देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे स्वर भाव तरंग हा सुगम संगीत कार्यक्रम स्वरंगण संगीत विद्यालय पुणे हे सादर करणारा असून सायंकाळी भव्य पालखी व शोभायात्रा निघणार असून ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करुन मंदिरामध्ये दीपोत्सव महाआरती पुणे शहराच्या पोलीस उपायुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या हस्ते होणार आहे.उत्सव रामरायाचा उत्सव श्रीराम सेवकांचा उत्सव प्रत्येक भारतीयांचा यानुसार गावातील कारसेवक घरोघरी जाऊन अक्षताचे वाटप करत आहेत यामुळे थेऊर मधील वातावरण रामभक्तमय झाले आहे चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विव्दांस, वैभव बडदे, रामचंद्र बोडके,निखिल काकडे, गणेश कुंजीर,विशाल घाडगे,प्रशांत खांडे,प्रशांत शेडगे, देवस्थान कर्मचारी घरोघरी जाऊन आनंदोत्सवाचे आमंत्रण देऊन अक्षता वाटप करत आहेत या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, उघोजक जयंत म्हैसकर, वास्तूतज्ञ आनंद पिपळकर, मुख्य विश्वस्त मंदार देव, जितेंद्र देव, अँड राजेंद्र उमाप,देवराज डहाळे उपस्थित राहणार असल्याची महिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विव्दांस यांनी दिली.गावामध्ये घरोघरी जाऊन रामभक्त हातात अक्षता घेऊन जय श्री राम नारा देत गाव पिंजून काढत आहे. आनंदोत्सवामुळे थेऊर सह परिसरात चैतन्यमय वातावरण झाले आहे
