थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे शहरालगत अष्टविनायकातील मानाचा गणपती असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर, ता.हवेली येथील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या, रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. सदर रस्ता खराब झाल्यामुळे येणाऱ्या भाविकांना व येथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठीक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. अखेर महाराष्ट्र शासनाच्या, ग्रामविकास विभागाकडून सदर रस्त्याच्या कामास ५० लक्ष रू निधी मंजूर झाला आहे. यामुळे चिंतामणी हायस्कूल चौक ते गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे, सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम होणार आहे. रस्त्याचे काम मंजूर होऊन, तात्काळ सुरू झाल्यामुळे, येणाऱ्या भाविकांनी व येथे राहणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे, विठ्ठल काळे, शशिकला कुंजीर, संतोष काकडे, संजय काकडे, गणेश गावडे, चंद्रभागा शिर्के, ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर पाटील, सुखराज कुंजीर, गणेश रसाळ, शहाजी जाधव, आनंद तांबे, बाळासाहेब शेडगे, हेमंत कांबळे, दत्तात्रय शेडगे, मेहबूब सय्यद, भाऊसाहेब कांबळे, संपत बिनावत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

“थेऊर गणपती मंदिरासमोरील रस्ता खराब झाल्यामुळे, येणारे भाविक व येथे राहणारे ग्रामस्थ यांची, रस्ता करण्याची मागणी होती. याच अनुषंगाने, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री.गिरीश महाजन यांच्याकडे निधी मिळण्यासाठी, मागील १ वर्षापासून पाठपुरावा केल्यामुळे, ५० लक्ष रू निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता मंजूर झाल्यामुळे, येणाऱ्या भाविकांना व येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.”

युवराज हिरामण काकडे

(सदस्य- ग्रामपंचायत श्रीक्षेत्र थेऊर)

 

“सदर रस्त्याच्या सुरू होणाऱ्या कामामुळे, येणारे भाविक व येथे राहणारे नागरिक यांच्या वाहतुकीत, काही दिवसांसाठी बदल करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत, भाविकभक्त व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. तसेच या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे संबंधित गाळाधारक व नागरिकांनी, स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा शासकीय इतमामात सर्व अतिक्रमणे मुक्त करण्याची, कार्यवाही करण्यात येईल.”

(ग्रामपंचायत प्रशासन, थेऊर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *