पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह ) लोणी काळभोर(ता.हवेली) ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोग 2023/24 निधीतून वार्ड क्रमांक 6 मधील तरवडी रानमळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरो फिल्टर बसवण्यात आला असून शाळेसह वार्ड क्रमांक 6 मधील नागरिक यांच्यासाठी फिल्टर पाणी पुरवठ्याचा लोकार्पण सोहळा लोणी काळभोर चे सरपंच योगेश काळभोर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रियंका सचिन काळभोर,माजी सरपंच राजाराम काळभोर, पोलिस पाटील दादा पाटील काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, संगीता काळभोर,भरत काळभोर, सविता लांडगे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळभोर, लक्ष्मण काळभोर,सागर काळभोर, सचिन काळभोर,गिताराम लांडगे, विशाल काळभोर ग्रामविकास अधिकारी एस एन गवारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिंदे सर पालक तसेच तरवडी रानमळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
