पुणे(हवेलीनामा वृत्तसमूह ) राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या हवेली तालुका वरिष्ठ उपाध्यक्षपदी अमृत बोरकर व राजू मारुती दगडे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिरूर हवेलीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप गोते, प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते.  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाची ध्येय धोरण तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना बळकट करणार तसेच गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिट्यांच्या माध्यमातून जनजागृती करणार  असल्याचे बोरकर व दगडे यांनी हवेलीनामाशी बोलताना सांगितले त्यांच्या या निवडीचे परिसरात स्वागत करण्यात येत असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *