पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) छत्रपती शिवरायांनी आपल्या
निवडक सहकार्याच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून हिंदवी स्वराज्य उभे राहिले देव, देश आणि धर्म यासाठी या स्वराज्याची उभारणी केली आणि अशा या राजाच्या शेवटच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट होऊ शकली नाही याची सल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात कायम राहिली यासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली सात वर्ष शिवनेरी गड ते पुरंदरगड असा पालखी सोहळा हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली चालू झाला यावर्षी हा सोहळा शिवनेरीहून प्रस्थानानंतर थेऊर मुक्कामी विसावला.
वढू येथील मुक्कामानंतर हा पालखी सोहळा लोणीकंद, वाघोली, केसनंद, कोलवडी मार्गे श्रीक्षेत्र थेऊर(ता.हवेली) येथे सायंकाळी सहा वाजता दाखल झाला या सोहळ्याचे  ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले हलगीचा ताल तसेच चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ नामसंकीर्तनात हा सोहळा येथे दाखल झाला यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले पालखी रथाची गावातून मिरवणूक काढून चिंतामणी मंदीरात स्वराज्य संघातील मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर, स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब दिघे, शिरूरचे स्वराज्य संघाचे अध्यक्ष विशाल दिघे,सचिन कारले, राम पाटील,वनाजी बांगर, ओंकार चव्हाण, माजी सदस्य गोविंद तारु, माजी विश्वस्त आनंद तांबे, रामकृष्ण पतसंस्थाचे संचालक वैभव बडदे, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे लक्ष्मण चव्हाण, सुदाम काळे, बाळासाहेब काळे, बाबुराव कुंजीर,संजय जाधव, अविनाश सोनवणे, बाळासाहेब शेडगे,नाना शेंडगे, आनंदा काकडे, रामचंद्र बोडके,बापू सोनवणे, बाळासाहेब गिरमकर, विकास कुंजीर, ओंकर तारु, मान्यवर उपस्थित होते.चिचवड देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यातील शिवशंभू भक्तांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *