पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह ) हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची या गावातील तरुण शेतकरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक व आळंदी मातोबाची नवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष चित्रसेन जवळकर वय 35 वर्ष यांचा शेतामध्ये विहिरीवरील मोटर बंद करण्यासाठी जात असताना सर्पदंश होऊन मृत्यू झाला होता चित्रसेन जवळकर यांच्या मृत्यूमुळे चित्रसेनचे कुटुंबीय व मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईकांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला होता चित्रसेन जवळकर यांच्या अंत्यविधीसाठी हजारो आप्तेष्टपणे पाहुणे नातेवाईकांनी हजेरी लावली होती आळंदी म्हातोबा गावच्या इतिहासात काळा दिवस म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली चित्रसेन जवळकर यांच्या जाण्याने कुटुंबावर फार मोठे दुःख होणे साहजिकच आहे मात्र यापुढेही शेती आणि शेतकरी यांचा संबंध कायम राहणार असल्याने अशा सर्पदंशाची घटना कोणत्याही शेतकऱ्यावरती येऊ नये यासाठी आळंदी म्हातोबा येथील जवळकर कुटुंबीय तसेच चित्रसेन जवळकर यांचे मेहुणे प्रभाकर जगताप यांच्या पुढाकाराने दशक्रिया विधीच्या दिवशी हरिभक्त पारायण पूनमताई जाचक यांचे प्रवचन ठेवले होते या प्रवचनाच्या नंतर तळेगाव ढमढेरे येथील गणेश टिळेकर यांनी सर्प आणि शेतकरी या संबंधाविषयी माहिती दिली सर्पदंश होऊ नये यासाठी घ्यायची काळजी तसेच सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे उपचार याविषयी सविस्तर माहिती सर्पमित्र टिळेकर यांनी दिली या अनोख्या समाजप्रबोधनाची माहिती दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या वेळी समाजाला दिल्याने अनेक शेतकरी व उपस्थित हजारो आप्तेष्ट नातेवाईकांनी जवळकर कुटुंबीयांचं कौतुक केले चित्रसेन जवळकर या तरुण शेतकऱ्यांचे अचानक जाण्याने आळंदी मातोबाची गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गावाने बैठक घेऊन गावाची होणारी म्हातोबा जोगेश्वरी आणि पीरसाहेब यांची यात्रा रद्द केली असल्याचे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात जाहीर केले कॅन्सर मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट घेऊन कार्य करणारे प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून व आर्ट ऑफ लिविंग एग्रीकल्चर ट्रस्टच्या वतीने हवेली तालुक्यात लाखो लक्ष्मीतरु वृक्षाची लागवड करण्यात आली प्रत्येक दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात प्रभाकर जगताप लक्ष्मीतरु वृक्षाचे वाटप करत असतात चित्रसेन जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमातही 1000 लक्ष्मी तरुक्षाचे वाटप करण्यात आले यावेळी हवेली तालुक्यातील अनेक मान्यवर या दशक्रिया विधीसाठी उपस्थित होते.
