पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये दाखल दाखल गुन्ह्यात पोलिसांना सांगून जामीन मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी लोकसेवकाकरता पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी इसम वकील शुभम गजानन नायकोडी याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार (वय70) यांच्या मुलाविरोधात भा. द. वि.कलम 307,341,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास लोकसेवक करत आहे या गुन्ह्यात तक्रारदार याच्या मुलाला लवकर जमीन मिळवून देण्याकरिता तक्रारदाराकडे 25000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. तक्राराची पडताळणी केली असता खाजगी इसम वकील शुभम नायकोडी यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या मुलांवर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटक केलेली आहे जयात लवकर जामीन मिळवून देतो याकरिता लोकसेवकास 20000 रुपये द्यावा लागतील असे सांगून पंचासमक्ष 20000लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार यांचे 17डिसेंबरला आकस्मिक मृत्यू झाल्याने सरकार तर्फे फिर्याद देण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, डॉ शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस निरिक्षक रुपेश जाधव, पोलिस शिपाई माने,कोमल शेटे यांनी केली
