पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) अभिनेते शरद पोंक्षे यांचा 26डिसेंबर रोजी अमरावती मधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात नथुराम गोडसे हा नाट्य प्रयोग झाला. नाट्य प्रयोग झाल्यावर त्यांनी सभागृहातील सोयीसुविधांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे आलेला अडचणींचा उपस्थित प्रेक्षकांना समोर पाढाच वाचला सभागृहातील साऊंड सिस्टीम स्टेजवर सर्वत्र पसरलेली धूळ कलावंतांसाठी असलेले स्वच्छता गृह यांची असलेली दुरवस्था बाबत नाराजी प्रगट करून अमरावतीतील आमदार खासदार यांना फक्त मत देऊ नका तर या सभागृहाची झालेली अवस्थेचा जाब विचारा या सभागृहाची स्वताची साऊंड सिस्टीम सुध्दा नाही ही अत्यंत धक्कादायक बाब असून पडदा उघडायला माणसं नाहीत बटणावर पडदा उघडत नाही ही चांगली अवस्था नसून येथील नाट्य परिषद येथील प्रतिष्ठीत नागरिक यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना सांगा 2024ला तुमच्याकडे येतील मत मागायला त्यावेळी ही बाब त्यांच्या लक्षात आणून द्या कारण सांस्कृतिक गरज आहे समाजाची उत्तम नाटक, नृत्य संगीत ही आपली मुलभूत गरज आहे. हे सगळं रंगमंदिरात चालतं त्यामुळे आपल्या शहराचे सांस्कृतिक वैभव जपणं त्याचा विस्तार होण हे येथील लोकप्रतिनिधींना सांगा अशी विनंती त्यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *