पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या संपाकडे राज्यसरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे 4 डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य कृती समिती, अंगणवाडी संघ यांनी संप केला आहे राज्यातील अंगणवाडी बंद आहेत त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कडकलक्ष्मीच्या अवतारात विविध मागण्यासाठी आंदोलन केले आहे.यापूर्वी देखील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर अंगणवाडी कृतीसमितीने भव्य मोर्चा काढला होता यात हजारोंच्या संख्येने राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यात सहभागी झाल्या होत्या.
सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी कडक लक्ष्मीच्या अवतारात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अगळवेगळ आंदोलन केले आहे.सरकाराला जाग आणण्यासाठी कडकलक्ष्मीच्या रुपात अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत मानधन वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा,पेन्शन अशा विविध मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर आहेत सांगलीच्या अंगणवाडी सेविका शुभांगी अशोक कांबळ यांनी कडकलक्ष्मीचा अवतार घेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या व्यथा मांडल्या सांगली जिल्ह्यातील विविध आंदोलने केली आज मर्गूबआईचा गाडा घेऊन मर्गूबाई का रस्त्यावर येते तिच्या पोटाची खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर उतरते घरोघरी भीक मागून जगत असते या मर्गूबाईच्या रुपात सरकारकडे भीक मागण्याची वेळ आली आहे पण आम्ही भीक मागत नाही आमचा जो हक्क आहे तेच मागत आहे सेविकाना 26000रुपये पगार तर मदतनीसला 22000 झाला पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे तसेच सरकारी कामाचा दर्जा मिळाला पाहिजे वैद्यकीय रजा उन्हाळी सुट्टी अशा विविध मागण्या आहेत त्या प्रलंबित असुन गेली चाळीस वर्षांपासून आम्ही लढा देत आहेत तरी सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज आम्ही मर्गूबाईचा गाडा घेऊन सरकार विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचे शुभांगी कांबळ यांनी सांगितले.यावेळी अंगणवाडी सेविका हातात थाळी चाबूक ताशा घेऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *