पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बापूसाहेब घुले यांची श्रीराम कुंजीरवाडीवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. संदीप गोपीचंद धुमाळ यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली यासाठी प्रकाश घुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून एस एन देसाई यांनी काम पहिले. यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे,गोरख घुले, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर,काळुराम कुंजीर, सुभाष कुंजीर,राहूल कुंजीर, अनिकेत कुंजीर, विनोद सावंत, सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ गाढवे, रघुनाथ काकडे, लक्ष्मण कुंजीर, बापूसाहेब कांबळे, पोपट झेंडे, दादा कुंजीर, दादा धुमाळ, सुदाम पुजारी, छाया कुंजीर, गोकुळ ताम्हणे,तसेच पोलिस हवालदार विजय जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *