पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) आळंदी म्हातोबा(ता.हवेली)  येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिक विविधीकरण प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला .महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी डाॅ.प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु , महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,डाॅ.सी.एस. पाटील, संचालक,कृषि विस्तार शिक्षण,डाॅ.एस.डी.गोरंटीवार, संचालक, कृषि संशोधन.डाॅ.एस ए.रणपिसे, अधिष्ठाता, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संजय काचोळे , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,पुणे सुरज मडके, उपविभागीय कृषि अधिकारी,मारुती साळे, तालुका कृषि अधिकारी, हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली  व मंडळ कृषि हडपसर यांच्या वतीने  आयोजित डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गट प्रशिक्षण, किसान गोष्टी कार्यक्रम, एकात्मिक शेती विकास प्रकल्प,कांदा पिक परिसंवाद कार्यक्रम मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ.उल्हास सुर्वे, नोडल अधिकारी, सेंद्रिय शेती प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, यांनी एकात्मिक शेती विकास प्रकल्प, सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेतीची मुलभुत तत्वे,सेंद्रिय कर्ब , जमीनीचे आरोग्य ते पिक उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण व विक्री बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.डाॅ.आदिनाथ ताटके,मृदा शास्त्रज्ञ  यांनी कांदा पिकाचे लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, फळबाग लागवड तंत्रज्ञान तसेच आंबा मोहोर संरक्षण, सेंद्रिय शेतीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनबाबत माहीती दिली.सुनिल उगले, कृषि विद्यावेता , शास्त्रज्ञ, यांनी पिक पद्धती  बाबत मार्गदर्शन केले मारुती साळे, तालुका कृषि अधिकारी, हवेली कृषि विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन केल.बाळासाहेब सोळंकुरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,भुदरगड नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनी, यांनी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी ची निर्मिती व विक्री व्यवस्थापन बाबत माहिती दिली.गुलाबराव कडलग, मंडळ कृषि अधिकारी, हडपसर , यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेती बाबत मार्गदर्शन केले.  मेघराज वाळुंजकर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-१, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती व पिक उत्पादनातील वापर बाबत मार्गदर्शन केले,रामदास डावखर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-२, यांनी महाडीबीटी प्रणाली अंतर्गत आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धत व  विविध योजनांच्या अनुदानाची वितरण पद्धती बाबत माहिती दिली श्रीमती सौरभ जाधव, कृषि सहाय्यक, आळंदी म्हातोबाची यांनी सेंद्रिय शेती शेतकरी गट प्रशिक्षण व किसान गोष्टी कार्यक्रम चे नियोजन केले. नागेश मेहेत्रे,शंकर चव्हाण.राजेंद्र भोसेकर,श्रीमती पुष्पा जाधव,श्रीमती ज्योती हिरवे, कृषि सहाय्यक  यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतले.सदर  कार्यक्रमाचे अध्यक्ष  रामदास पोपट जवळकर ,माजी चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, यांनी कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या कामाची प्रशंशा केली तसेच  लक्ष्मण भोंडवे,तंटामुक्ती अध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले .सदर प्रशिक्षण वर्गास प्रगतशील शेतकरी शिवाजी खंडेराव जवळकर, विलास जवळकर गणेश कुंजीर,विजय सुरेश जवळकर,कैलास भोंडवे,बाळासाहेब भोंडवे,श्री.तिखे काका,माऊली माथेफोड.लक्ष्मण खटाटे  व इतर सर्व शेतकरी व महिला
शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी प्रशिक्षण वर्गानंतर विजय सुरेश जवळकर यांच्या सेंद्रिय आंबा बागेत क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले व तेथे सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ची प्रात्यक्षिके करण्यात आली व पिक उत्पादन मधील वापराबाबत कृषि  शास्त्रज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *