पुणे–(हवेलीनामा वृत्तसमूह) नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात घाटात आठ जणांचा मृत्यू यात अपघातात माळशेज घाटा शेजारी असणारे म्हणून मढ गावातील कुटुंबाचा समावेश. नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे गावच्या हद्दीत झालेल्या भीषण तिहेरी अपघातात आठ जणांचा जागेवर मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील चार जणांचा यात समावेश आहे पती पत्नीसह दोन लहान बालकांचा समावेश आहे पाहुण्यांच्या लग्नाचा कार्यक्रम उरकून परतत असताना रात्री हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे अपघातात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आहे गणेश मस्करे वय
30कोमल मस्करे 25 हर्षदा मस्करे 4 काव्य मस्करी वय 6 अशी मृतांची नावे आहेत. गणेश मस्करे पिअकप गाडी घेऊन आपल्या कुटुंबासमवेत पाहुण्यांच्या लग्नासाठी जुन्नर मधील पिंपळवाडी येथे गेले होते लग्न उरकून उशिरा घरी परतत असताना अपघात झाला आळेफाट्याकडून पिकअप एम एच 14 एजी1940ओतूरकडून कल्याणकडे जात असताना कल्याण कडून ओतूर कडे येणाऱ्या रिक्षा एम एच 03बी वाय 9023 यांची समोरासमोर धडक झाली यात रिक्षा चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला यात पिकअप पलटी होऊन समोरून येणाऱ्या ट्रक एम,एच16डीसी1160 ची जोरात धडक बसली यात पिकअप मध्ये पुढे बसलेल्या मस्करे कुटुंबासह मागे बसलेला एक आणि रिक्षातील तीन अशा आठ जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.
