पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह )उरुळी कांचन ते शिंदवणे- जेजुरी हा महामार्ग शिंदवणे वाकवस्ती पाझर तलावाच्या कडेने नकाशा प्रमाणे करण्याच्या मागणीसाठी शिंदवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सदस्य गणेश महाडिक शिंदवणे ग्रामस्थांसह आमरण उपोषणास बसले आहेत. शिंदवणे गावातून जाणारा राज्य महामार्ग क्रमांक 117 उरुळी कांचन ते जेजुरी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. परंतु या रस्त्याचे काम शिंदवणे वाकवस्ती पाझर तलावाच्या कडेने नकाशा प्रमाणे होणे अपेक्षित आहे.महामार्गाचे काम जुन्या वहिवाटिवर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे त्या ठिकाणी खूप वेडी वाकडी वळणे आहेत त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे नकाशात असलेल्या पाझर तलावाच्या कडेने रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी शिंदवणीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश महाडिक यांच्यासह गावातील भजनी मंडळ ग्रामस्थ भजन करून शिंदवणे वाकवस्ती पाझर तलाव या ठिकाणी उपोषणास बसले आहेत दहा दिवसांच्या आत हा रस्ता नकाशा प्रमाणे करावा असा इशारा उपोषण द्वारे दिला असून या उपोषणास रयत शेतकरी संघटनेने पाठींबा दिला आहे
