पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) शिधापत्रिका पुर्ववत करून अन्नधान्य चालू करण्यासाठी 4500 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2800 रुपये लाच स्वीकारताना एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे यातील तक्रारदार याच्या नावे असलेली शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी व अन्नधान्य चालू करण्यासाठी जुनी पुणे जिल्हा परिषद कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रारदार भेटलं. या ठिकाणी असलेला खाजगी इसम शंकर शिवाजी क्षीरसागर वय 32वर्ष ताब्यात घेतले.साहेबांचे काम मी करतो व तुमचे रेशनकार्ड काढून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडे 4500रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 2800रूपये घेताना रंगेहाथ पकडले यात एका 67 वर्षीय नागरिकांनी तक्रार दिली होती. तक्रारदाराला साडेचार हजार रुपयाची लाच मागितली होती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली त्याची पडताळणी करून जुनी पुणे जिल्हा परिषद समोर फुटपाथवर सापळा लावण्यात आला यावेळी 2800 रुपये लाच घेताना शंकर क्षीरसागर याला पकडण्यात आली.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर नाईक वनिता गोरे पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे पोलीस शिपाई कदम यांनी ही कारवाई केली
