पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथील संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबीरात पोलिसांनी केले रक्तदान. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलिस हवालदार विजय जाधव, दिगंबर जगताप,विशाल बनकर यांनी रक्तदान करुन पोलिस कायदा व सुव्यवस्था राखताना दैनंदिन जीवनात सामाजिक बांधिलकी जोपासत असतात हे आपल्या कृतीतून सिद्ध केल्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी परिसरातील अनुयायी तसेच नागरीकांनी रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवला या रक्तदान शिबिरात महिलांना देखील रक्तदान केले
हवेलीनामाशी बोलताना देशमुख यांनी सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपण केलेल्या रक्तदानाच्या कार्यमुळे अनेक गरजू रुग्णांना त्याचा फायदा होऊन गरजूंना मदत होऊन जीव वाचवण्यास मदत होऊन पुण्याचे काम होते.प्रत्येक गावातील तरूण मंडळांनी रक्तदान शिबीर आयोजित करावीत यामुळे राज्यातील रक्त तुटवडा भरुन निघण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *