पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अपघातात जप्त केलेली गाडी सोडवण्यासाठी दीड लाखाची लाचेची मागणी करून तडजोडी आणती एक लाख रुपये एक लाख रुपये ठरली त्यापैकी 70 हजार रुपये घेऊन उरलेले पैसे मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास २०००० हजाराची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लक्ष्‍मण राजे वय 54 याला ताब्यात घेतली याबाबत एका 32 वर्षीय नागरिकांनी तक्रार दिली होती तक्रारदाराच्या गाडीचा अपघात झाला होता अपघाताबाबत चिखली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे या अपघातामधील गाडी तक्रारदाराला परत करण्यासाठी दीड लाखाची लाच नरेंद्र राजे यांनी मागितली होती तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले त्यातील १३डिसेंबरला पंधरा हजार व १५डिसेंबरला 55000 दिले उरलेले वीस हजार रुपयांची तो मागणी करत असल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलूचपत लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करून चिखली पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला होता. यावेळी वीस हजार रुपयाची लाच घेताना नरेंद्र राजे याला रंगेहात  पकडण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारी पोलीस शिपाई भूषण ठाकूर सुरडकर पोलीस हवालदार चव्हाण यांनी ही कारवाई केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *