पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेली तालुक्यातील वाघोली येथे शेतकरी ते ग्राहक बाजाराचे आयोजन वाघोलीतील आयव्ही इस्टेट रोडवरसोलफ्रेश अग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी आयोजित शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार विक्री चे आयोजन वाघोलीतील युवा उद्योजक बाप्पुसाहेब हरगुडे, संतोष हरगुडे यांचा वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला वाघोलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर कटके, भाजपा युवा मोर्चाचे अनिल सातव, संदिप शिंदे व सर्व आयव्ही नागरिक यांच्या हस्ते उदघाटन करून मार्केटची सुरवात करण्यात आली. या बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला,फळे कडधान्ये, धान्य,दुध, दुग्धजन्य पदार्थ, घरगुती चटणी, मसाले, सेंद्रिय व गावरान भाजी रास्त दरात मिळणार असून हा बाजार दर शनिवारी भरणार असल्याची माहिती हरगुडे यांनी दिली.
वाघोलीमधील नागरिकांना दैनंदिन वापरातील गोष्टी स्वच्छ, ताज्या, सेंद्रिय स्वरूपात व रास्त दरात मिळाव्यात हा हरगुडे बंधुंचा यामागील मुख्य उद्देश आहे.
