पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) आळंदी म्हातोबा(ता.हवेली) गावाचे ग्रामदैवत श्री म्हातोबा जोगेश्वरी जन्मोत्सव मंगळवार दिनांक ५ रोजी आनंदात पार पडला.यावेळी सकाळी ग्रामस्थांच्या व मंदिराचे पुजारी प्रवीण राजगुरू तसेच गाव पुरोहित केशव तिखे यांच्या उपस्थितीत श्री म्हातोबा जोगेश्वरी अभिषेक पार पडला.यावेळी श्रींच्या मूर्ती वस्त्र अलांकराने सजविण्यात आली होती.संध्याकाळी राकेश पिंजन सरकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिव वंदना करण्यात आली.त्यानंतर आळंदी देवाची येथील अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तसेच गावातील तरुणांनी पालखी मिरवणूक काढली.रात्री ८ ते ९ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप चेतन महाराज माथेफोड शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. जन्मोत्सव निमित्ताने गावात प्रथमच अशा रीतीने कार्यक्रम झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.यावेळी गावातील सर्व अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
