पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील उरूळीकांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेचे भारती विद्यापीठ इंग्रजी बहिस्थः परीक्षेत शाळेतील मुलींनी मिळवले घवघवीत  यश परिसरात होत आहे कौतुकाचा वर्षाव

भारती विद्यापीठ आयोजित सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिस्थः परीक्षेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरा तील इयत्ता ५ वी इंग्रजी प्री प्रायमरी परीक्षेत कु .दुर्वा चंद्रकांत सुरवसे हिने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला . तसेच माध्यमिक विभागातील कु . सिद्धी विजय कांचन इयत्ता १० वी हिने इंग्रजी ॲडव्हान्स् परीक्षेत राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला .

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  राऊत मॅडम तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली .या यशाबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांनी विदयार्थी, मुख्याध्यापिका व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *