पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) शिवसेना (उध्दव ठाकरे गट) हवेली तालुका ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुखपदी थेऊर ता.हवेली येथील राहूल भगवान काकडे यांची निवड करण्यात आली.
दादर येथील शिवसेना भवन मध्ये त्यांना निवडीचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी कक्षाचे सरचिटणीस विजय मालवणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणीसह. हवेली,मावळ, शिरूर,खेड, जुन्नर तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या.
हवेली तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपतालुकाप्रमुखपदी
लक्ष्मीकांत काळभोर,चंद्रकांत साकोरे, संजय गोलांडे यांची तालुका संघटक तर पुणे जिल्हा उपसंघटक म्हणून कृष्णा चौधरी यांची निवड करण्यात आली.
