थेऊर (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्र कृषी व शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त २१०० लक्ष्मीतरु वृक्षांच्या वाटपाचा शुभारंभ न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथून करण्यात आला.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर ,नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालय गुरोळी ,आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिंपळे, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर व शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे २१०० लक्ष्मीतरु वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विजय कोलते यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथून लक्ष्मी तरु वृक्ष वाटपाचा शुभारंभ करण्यात आला .
आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे शिक्षक व वृक्षमित्र प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रत्येकी एक झाड देण्यात आले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांचा वाढदिवसानिमित्त मनीभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या शुभेच्छा पर मनोगतातून विजय कोलते म्हणाले की ‘ आपल्या देशात कॅन्सरची समस्या खूप मोठी आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या, ताणतणाव, विविध आजारपण यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यातीलच हा लक्ष्मीतरु वृक्षाचा उपक्रम आपण आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रभाकर जगताप यांच्या माध्यमातून राबवित आहोत. आपल्या शाखेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा वृक्ष लावून त्याची जोपासना करावी. या वृक्षापासून अनेक उत्पादने घेतली जातात उदा. विविध प्रकारची तेल, साबण. पर्यावरणाच्या दृष्टीने या वृक्षाचे खूप महत्त्व आहे म्हणून सर्वांनी हा वृक्ष जरूर लावावा.’
याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग चे सुनील पोतदार , प्राचार्य गोपीनाथ बोत्रे, प्रभाकर जगताप , सेंद्रिय शेतीच्या शिक्षिका युगंधरा बर्गे, हवेलीच्या माजी तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील , मनीभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, अष्टापूर गावचे माजी सरपंच नितीन मेमाणे यांनी विजय कोलते आपल्या भाषणातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रम प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर व बोरी ऐंदीच्या सरपंच सविता भोसेकर, सेंद्रिय शेती शिक्षिका कविता वडगावे , शुभांगी हरपळे, पिंपरी सांडस चे उपसरपंच माजी उपसरपंच रघुनाथ हरपळे, बापूसाहेब चौधरी, स्कूल कमिटीचे सदस्य तयाजी जगताप, रमेश कोतवाल, विजय कोतवाल, मधुकर म्हेत्रे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिंपळे येथील मुख्याध्यापक बिभीषण जाधव, नामदेव गंगाराम शिंगाडे विद्यालय गुरोळी येथील मुख्याध्यापक अनिल शिरसागर , न्यू इंग्लिश स्कूल जेऊर येथील मुख्याध्यापक जालिंदर जगताप आदि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव घोगरे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन उपशिक्षक सुभाष काळे यांनी तर आभार उपशिक्षक प्रशांत जगताप यांनी मानले.
