पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आजोबांकडून बक्षीसपत्र मिळालेल्या एकोणचाळीस गुंठे जमिनीची नोंद सातबा-यावर लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारल्या प्रकरणी पुरंदर तालुक्यातील भाऊसाहेब अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, याप्रकरणात एका खाजगी इसमास देखील अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आजोबांकडून एकोणचाळीस गुंठे जमीन बक्षीस मिळाली त्याची तलाठी दप्तरी नोंद घालून सातबा-यावर नाव लावण्यासाठी रितसर अर्ज दाखल केला परंतू सोनोरी ता.पुरंदर येथील तलाठी निलेश गद्रे यांनी खाजगी इसम आदित्य कुंभारकर याच्या माध्यमातून ही लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या दोघांविरुद्ध पुरंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *