थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊरफाटा येथील अग्रगण्य श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप सुखराज धुमाळ यांची तर व्हाईस चेअरमन पदी संभाजी गोरखनाथ आंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर नूतन संचालक पदी सचिन तुपे, महादेव धुमाळ, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, अजय कुंजीर, सौ सुनीता धुमाळ,सौ वैशाली मेमाने,राजेंद्र गायकवाड,उमेश राखपसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर तज्ञ संचालक पदी पोपट चौधरी व दत्तात्रय कुंजीर तसेच कार्यकारी संचालक म्हणून ज्ञानेश्वर धुमाळ यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण साकोरे यांनी काम पाहिले. थेऊरफाटा येथील श्रीनाथ पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 करिता बिनविरोध पार पडली.
संस्थेचे एकूण सभासद 1830 असून, संस्थेच्या ठेवी 34.48 कोटी आहेत. संस्थेचे एकूण खेळते भांडवल 49.79 कोटी असून संस्थेने 14% लाभांश वाटला आहे. संस्थेस सतत ऑडिट वर्ग “अ” आहे. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेची चेअरमनपदाची धुरा संदीप धुमाळ निस्वार्थ वृत्तीने सांभाळत आहेत. हवेली तालुक्यातील श्रीनाथ पतसंस्था एक अग्रगण्य पतसंस्था आणि आधुनिकतेची कास धरणारी आणि स्वच्छ, पारदर्शक आणि शिस्तप्रिय संस्था म्हणून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
भविष्यात संस्था सभासदाच्या आवश्यकते नुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावला जाईल. तसेच युवा व्यवसायिकांना व्यवसाय करिता आर्थिक मदत करनेस आम्ही कटीबध आहोत तसेच सर्व संचालकांना सोबत घेऊन सभासदांच्या हिता चे निर्णय घेण्यासाठी पण आम्ही बांधील आहोत या प्रकारचे मनोगत नवनिर्वाचित चेअरमन संदीप धुमाळ यांनी व्यक्त केले.
