पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे शहरालगत असलेले केसनंद (ता.हवेली) येथील गावामधील तरुणांनी एकत्र येत छावा ग्रुपची स्थापना केली यामध्ये देशातील तसेच राज्यातील सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात याचाच भाग म्हून दरवर्षी प्रमाणे अखिल छावा गृप केसनंद आयोजित अखिल केसनंद गाव दहीहंडी उत्सव २०२३ मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती छावा ग्रुप चे संस्थापक व केसनंद गावचे विद्यमान सरपंच दत्ता (आबा) हरगुडे व ग्रुप चे अध्यक्ष संदीप (आप्पा) ढोरे यांनी हवेलीनामाशी बोलताना सांगितले. सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे परिसरातील गावांमध्ये या दहीहांडीचे आकर्षण असते गावातील जेष्ठ नागरीकांसह बालगोपांलाची कार्यक्रम पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होते.
८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दहीहांडी उत्सवाचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री फुलपाखरू फेम ऋता दुर्गुळे उपस्थित राहणार आहे. तर मनोरंजना साठी संध्या पाटील ऑर्केस्ट्रा असणार असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष दिनेश हरगुडे व उपाध्यक्ष विक्रम हरगुडे यांनी सांगितले.छावा गृप या कार्यक्रमा बरोबरच सामाजिक बंधिलकी जोपासत असताना ग्रुप च्या सहकार्याने बाबा महाराज टेकडी वर १० हजार झाडे लावण्यात येणार असून त्याचे संगोपन व व्यवस्थापन छावा ग्रुप करणार आहे. तरी प्रत्येक ग्रामस्थांने किमान दोन तरी झाडे लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गावातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना छावा ग्रुप च्या माध्यमातून शैक्षणिक सहकार्य करण्यात येणार आहे.केसनंद गावा मधील मानाच्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन व व्यवस्थापन छावा ग्रुप चे संस्थापक केसनंद गावचे विद्यमान सरपंच दत्ताआबा हरगुडे, अध्यक्ष संदिप आप्पा ढोरे, यांच्या मार्गदर्शना खाली दहीहंडी उत्सव कमीटीचे सचिन आप्पा हरगुडे, उमेश मोरे, विशाल हरगुडे, अॅड अनिल हरगुडे, निखिल ढोरे, स्वप्नील सातव, सागर हरगुडे, गणेश गावडे, आजित कांचन, गणेश कांचन, स्वप्लीन बांगर, भरत वाबळे व इतर संचालक मंडळ करणार आहेत
