पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यातील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पुणे महानगरपालीकेकडून दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधणे शक्य आहे का? असल्यास नेमकी कशाची उभारणी करायची, यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे या विषयासह अन्य महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात निधी देण्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत ठरल्यानुसार महापालिकेने अवघ्या दोनच दिवसांत २३७४ कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर करण्यात आला होता. त्यापैकी कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सरकारने २०० कोटी रुपये दिले आहेत. सरकारकडून अधिक निधी मिळण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहराची दाट लोकवस्ती आणि रस्त्याची रुंदी अपुरी परिणामी रस्त्यावर असलेल्या वाहनाची प्रचंड संख्या याचा मेळ बसत नाही यावर तोडगा म्हणजे ग्रेडसेपरेशन करणे आणि उडाणपुलाची निर्मिती करणे तसेच सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करणे होय. मेट्रोच्या माध्यमातून काही प्रमाणात रस्त्यावरील ताण कमी होऊ शकतो परंतू मेट्रोचे उर्वरित सर्व मार्ग लवकरात लवकर सेवेत समाविष्ट होणे गरजेचे आहे.आज अनेक चौकात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे एखाद्या रुग्णवाहिकेस मार्ग काढून द्यायचा झाल्यास अतिशय तारेवरची कसरत करावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *