मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह]
राज्यातील पॅथॉलॉजी (चाचणी प्रयोगशाळा) लॅबच्या नोंदणीसाठी सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. मात्र आरोग्याशी निगडित अशा लॅबवर नियंत्रण यावे यासाठी लवकरच मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल सादर करणार असून त्यानुसार पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण निश्चित करण्यात येईल, होते. असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीचे उत्तर देताना सांगितले. हि लक्षवेधी सदस्य प्रवीण दरेकर, भाई गिरकर, भाई जगताप, अनिल परब यांनी मांडली.
सांगली येथील वैद्य योगेश माहिमकर यांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांच्याकडे येत असलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांचे रक्त सांगलीमधील वेगवेगळ्या ४ नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले, त्यानंतर या चारही लॅबचे रिपोर्ट हे वेगवेगळे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा लॅबवर शासन काय कारवाई करणार ? अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत बोलत होते.
तनाजी सावंत यांनी याविषयी वैद्य माहिमकर यांनी पत्र दिले असून त्यांनी व्हीडिओ व्हायरल केला पण कुणाकडेही तक्रार दाखल केली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र अनिल परब सायबर गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रही राहिल्यानंतर असा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर आरोग्य उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. २४ तासांत याविषयीचा अहवाल आरोग्य खात्यामार्फत मागविण्यात येईल, असे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यातील विशेषतः पुणे शहर व परिसरातील अशा लॅबची तपासणी अरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात यावी कारण अनेक ठिकाणचे अहवाल वेगवेगळे येण्याची दाट शक्यता आहे सर्वसामान्य नागरिकांना याची कल्पनाच नसते.
