थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] (शरद पुजारी) ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात याच हेतूने ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र काम करत आहेत आणि या माध्यमातून ही सेवा पोहोचवली देखील जात आहेच.परंतु या सेवा पुरविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अविरतपणे होत असलेले परिश्रमाचीही प्रचिती येते.पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कविता लंबे या आरोग्य सेविकेने दोन दिवसात सात प्रसूती करुन आपल्या कामाचा ठसा उमटविला.

आरोग्य सेविका कविता लंबे यांच्या कामाची दखल घेऊन पुणे मंडल विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार व डाॅ.संदीप सांगळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी येथे भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

सर्वसामान्य कुंटुंबातील नागरिकांना अधिकाधिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.विशेषतः पावसाळ्यात अनेक आजार तोंड वर काढतात त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी आपणही उचलावी असे आवाहन आरोग्य केंद्र अधिकारी डाॅ.महेबूब लुकडे यांनी केले आहे.या दिवसात डेंगू मलेरिया, चिकुणगुणिया या सारखे आजार पसरतात.याची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रास संपर्क करावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *