पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] उरुळीकांचन येथील घडलेल्या घटनेचा संपूर्ण पूर्व हवेलीतून निषेध होत असून गावोगावी निषेध सभांमधून नराधमांना कठोर शिक्षेची मागणी होत आहे.एका शाळकरी मुलीला दोन सख्या भावांकडून गेली पंधरा दिवस होत असलेल्या आत्याचाराने एकच खळबळ उडाली.पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षेची भिती वाटू लागली आहे.

          देशात महिलांवर अनेक ठिकाणी अतिप्रसंग उद्भवतात.त्याचा संपूर्ण समाजावर परिणाम होतो.मुलीचा पालक तर अशावेळी विचार करत बसतो.उरुळीकांचन येथील हा भयंकर प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक प्रकार समोर येत आहेत यात शाळा महाविद्यालयासमोर उभे असलेले रोडरोमिओ तसेच रस्त्यावरुन आपल्या घरी जाताना रस्त्यात दुचाकीचा शो करत पाठलाग करणार्‍यांवर टग्यांवर आतातरी कारवाई होणार का? हा देखील सवाल पालक उपस्थित करत आहेत.
          पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळीकांचन लोणी-काळभोर यासारखी मोठ्या लोकसंख्येची शहरे आहेत गेल्या काही वर्षांत येथील नागरीकरण वाढत गेल्यावर अशा प्रकारात वाढ होत आहे.यावर पोलीसांकडून ताबडतोब कारवाई करत अशा प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे,गेली दोन दिवसापासून समाज माध्यमावर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करताना या प्रवृत्ती ठेचून काढण्यात याव्यात अशा प्रतिक्रिया येत आहेत
          उरुळीकांचन येथे घडलेल्या घटनेनंतर लोणी-काळभोर गावातील ग्रामस्थांकडून एकत्र येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन देण्यात आले.तर उरुळीकांचन येथे मुक मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.उद्या शनिवारी संपूर्ण उरुळीकांचन शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे यातून अत्यावश्यक सेवा शाळा वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *