पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] नायगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र रतन चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी किरण गुळुंजकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या पतसंस्थेची सन 2023 ते 28 या कालावधी साठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली यात ही बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी बाळकृष्ण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली होती या सभेत संस्थेचे संस्थापक राजेंद्र रतन चौधरी यांची चेअरमन पदी व किरण भैरू गुळुंजकर यांची व्हॉइस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालक उत्तम घुले, मच्छिंद्र चौधरी, संतोष हगवणे, विजय चौधरी, अविनाश चौधरी, पोपट हगवणे, रामचंद्र माने, विशाल चौधरी, गौरव चौधरी, विराज शेलार, सौरभ भंडलकर, सविता पवार, नंदा कुंभार उपस्थित होते तसेच लेखापरीक्षक प्रकाश गोळे, व्यवस्थापक नंदकुमार चौधरी, सरपंच जितेंद्र चौधरी, गणेश चौधरी, नितीन हगवणे, उत्तम शेलार, दत्तात्रय बारवकर, योगेश चौधरी, नवनाथ गायकवाड, रामचंद्र पवार, कृष्णा चौधरी, सुनील हगवणे, संजय कामठे, जालिंदर शिर्के, अतुल भंडलकर, किरण चौधरी, विजय चौधरी, संजय चौधरी, हर्षल खेडेकर, नंदू चौधरी इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी सभेचे अध्यक्ष बाळकृष्ण घुगे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांचे अभिनंदन करून संस्थेचे कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
