पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत आंतरजिल्हा चोऱ्या व दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत तब्बल १८ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून यात १७,६४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मागील अनेक दिवसापासून पुणे तसेच अहमदनगरच्या ग्रामीण भागात शेतात असलेल्या घरांवर दरोडे टाकणार्‍या टोळीचा मोहरक्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथके तयार करुन अनेक सी सी टीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत मिळलेल्या महितीवरुन अजय उल्हासाय काळे रा.कडुस ता.पारनेर जिल्हा अहमदनगर याला यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून व बातमीदाराकडून मिळालेल्या महितीवरु पथकाने गणेश सुरेश भोसले (वय २८ रा.वाळुंज ता.पारनेर जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ८ग्रम सोने सोन्याचा बदाम, चोरी केलेली युनिकाॕर्न मोटार सायकल,घडयाळ,ब्रेसेल्ट जप्त केले. अधिक तपास केला असता त्याने वेळोवेळी केलेल्या चोऱ्या दरोडे टाकून चोरी केलेले सोन्याचे दागिने किरण भाऊसाहेब बेंद्रे (वय ३३ रा.वाळुंज ता,पारनेर जिल्हा अहमदनगर) या सराफास विक्री केले त्याला नगर येथून ताब्यात घेतले असता गुन्ह्यात चोरी गेलेल्या सोन्यापैकी २९४ग्रॕम सोन्याचे दागिने असा एकूण १७,६४०००रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये अजय काळे,गणेश भोसले,पावल्या उर्फ देवा कैलास काळे,कैलास काळे,शरद काळे यांचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

           ही कामगिरी पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीणअंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. नेताजी गंधारे, स.पो.नि. महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहा. फौज. तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पो. हवा. सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अभीजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पो.ना. बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, सहा. फौज. काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, पो. कॉ. दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पो. नि. प्रमोद क्षिरसागर, स.पो.नि. नितीन अतकरे, निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास स. पो. नि. नितीन अतकरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *