पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे महानगरपालिकेच्या चतुःशृगी पाणीपुरवठा विभागातील मिटर रिडरने ना हरकत पत्र देण्यासाठी रुपये २५,०००/- (पंचवीस हजार रुपये)ची लाच मागितल्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केल्यानंतर त्यास लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर असून, लायझनींगचे काम करतात. त्या संदर्भाने पुणे महानगरपालिकाचे पाणीपुरवठा विभागकडून ना हरकत पत्र मिळवण्यासाठी अर्जदार बिल्डर यांनी सिटी सर्वे नंबर २२८१ ते २२८८ शिवाजीनगर, भांबुर्डी, पुणे येथील मिळकतीचे पाणीपुरवठा विभागाचे ना-हरकत पत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांचे प्लंबिंग लायसन्सची प्रत जोडून अर्ज केला होता. पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत पत्र मिळण्यासाठी तक्रारदार हे पाठपुरावा करत होते. ना-हरकत पत्र घेणेसाठी कर्वे रोड येथील पाणीपुरवठा विभागात गेले असता, मीटर रीडर लोकसेवक उमेश कवठेकर यानी ना हरकत पत्र देण्यासाठी २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) लाचेची मागणी केली त्यावर तशी तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक उमेश कवठेकर यानी ना हरकत पत्र देणसाठी तक्रारदाराकडे त्यांचे दोन वरिष्ट अधिकारी यांचेसाठी प्रत्येकी १०,०००/ रुपये व स्वतः साठी ५,०००/- रुपये अशी एकूण २५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन ती लाच रक्कम चतः श्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालय रोड, पुणे आवारात पंचासमक्ष स्विकारल्यावर लोकसेवक उमेश कवठेकर याना रंगेहाथ पकडण्यात आले असून, डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यामध्ये त्याना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक संदिप व-हाडे तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र,व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात सर्पक साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
