पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] यशवंत चा सभासद गेली दहा ते बारा वर्ष जा राजकीय इच्छाशक्तीकडे आशा लावून बसला होता त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाल्यानंतर शेवटी स्वतःच आपला यशवंत पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सभासद कंबर कसून कामाला लागला असून प्रबळ इच्छाशक्ती व कारखाना चालू करण्यासाठी मनापासून धडपड करण्याची तयारी दाखवून स्वतःच हा कारखाना चालू करायचा असा प्रण मनाशी धरून पुन्हा सर्व सभासद कामाला लागले आहेत याचीच परिणती म्हणून संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद प्रत्येक गटातील सभासदांनी करण्याचे उद्दिष्ट ठरवून घेतले आहे कारखान्याच्या प्रत्येक गटामध्ये बैठका घेऊन कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी पुढाकार घेऊन हा कारखाना पुन्हा चालू करायचा यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे आज पर्यंत कारखान्याच्या चार गटात यशस्वीपणे बैठका घेतल्यानंतर आज पाचव्या गटामधील सभासद शेतकऱ्यांची बैठक पार पडली यात देखील सभासदांनी एकमुखी बिनविरोध संचालक मंडळ निवडणुकीस पाठिंबा दिला तसेच काही सभासदांनी पुढाकार घेऊन पाच लाखाचा निधी गोळा केला. माजी संचालक पांडुरंग काळे यांनी तीस लाखाचा निधी प्रशासक संजय गोंदे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर कारखान्याच्या प्रत्येक गटातील सभासदांकडून या निधी व निवडणूक संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. यापैकीच चार क्रमांक गटातील सभासदांकडून अकरा लाखाचा निधी नुकताच काळे यांच्याकडे देण्यात आला.
वाघोली,केसनंद, कोलवडी,साष्टे, आव्हाळेवाडी,तळेरानवाडी, निरगुडी, लोहगाव मांजरी खुर्द आणि वडगाव शिंदे या पाच नंबर गटाच्या गावातील शेतकरी सभासदांची बैठक कोलवडीतील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपस्थित सभासदांपैकी सुरेश फकीरराव कामठे, संतोष सुदाम हरगुडे साहेबराव बांगर,सोमनाथ रामचंद्र उंदरे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश तर मानसिंग बाबुराव गायकवाड 51 हजाराचा धनादेश तसेच ॲड अनिल हरगुडे यांनी रोख 51 हजार रुपये माजी संचालक पांडुरंग रामचंद्र काळे यांच्याकडे सुपूर्द केले.तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात एकमुखी पाठिंबा असल्याचे जाहीर केले.यागटातील प्रत्येक गावातील शेतकरी सभासद गावपातळीवर येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन निवडणूक निधी गोळा करून लवकरच काळे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव,वाघोलीचे माजी उपसरपंच वसंत जाधवराव,मारुती गाडे,संग्रामदादा जाधवराव,संतोष सुदाम हरगुडे,संदीप जाधवराव,मंगेश सातव कोलवडीचे नानासाहेब मुरुकुटे,सतीश माधवराव गायकवाड,मालशिंग बाबुराव गायकवाड,केसनंदचे सरपंच संतोष पांडुरंग हरगुडे,ॲड. अनिल हरगुडे,बाबासाहेब तुकाराम हरगुडे,शरद हरगुडे आदी मान्यवर सभासद उपस्थित होते.
