पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) जिद्द मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यशाला सहज गवसणी घालता येते याची अनेक उदाहरणे आहेत यापैकीच एका शेतकरी कुटुंबातील युवतीने आपल्या स्वप्नांना आकार देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्यात सहावा क्रमांक प्राप्त केला.

नाशिक जिल्ह्यात माहेर असलेल्या आणि पुण्यातील हवेली तालुक्यातील सासर असलेल्या ऐश्वर्या डोखळे कुंजीर या युवतीने सन 2022 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक नगरविकास अधिकारी परिक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात सहावा क्रमांक पटकावून यशाला गवसणी घातली आणि आपल्या वडिलांचे स्वप्न वास्तवात उतरवले.

यावर ऐश्वर्याने या यशाबद्दल हवेलीनामाशी बोलताना सांगितले की,माझे पदवी शिक्षण बी ई सन 2017 मध्ये पूर्ण केले त्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षण चालू असताना प्रशासकीय सेवेत नोकरीसाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली कारण प्रशासकीय सेवेत सेवा करण्याचे वडिलांचे राजेंद्र डोखळे यांचे स्वप्न होते परंतु काही अडचणीमुळे ते पुर्ण करता आले नाही.परंतु त्यांनी आपली कन्या ऐश्वर्या हीस यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले.

ऐश्वर्याचे पदव्युत्तर शिक्षण सन 2019 मध्ये पूर्ण झाले यादरम्यान तिने पहिला प्रयत्न केला होता.त्यानंतर सन 2019 मध्ये दुसर्‍यांदा प्रयत्न केला परंतु अपेक्षित यश मिळाले नाही त्यानंतर कोरोना महामारीमुळे सर्व ठप्प झाले याच संधीचा फायदा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवले आणि सन 2021 मध्ये हवेलीतील थेऊर येथील विठ्ठल हरिभाऊ कुंजीर यांचे चिरंजीव अजय कुंजीर यांच्याशी विवाह झाला.विवाहानंतर पती अजय यांनी देखील ऐश्वर्याच्या प्रशासकीय सेवेतील प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देत होते त्यानंतर सन 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतलेल्या सहाय्यक नगरविकास अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटात राज्यात सहावा क्रमांक मिळविला.

स्री ही मुलगी,पत्नी आणि आईची भूमिका बजावत असतानाच आपल्यातील सुप्त कौशल्य तथा बुध्दीमत्तेचा साक्षात्कार देत असते यातूनच या जबाबदाऱ्या पार पाडत आपले स्वप्न साकरत असते याचेच ऐश्वर्याच्या रुपाने एक उदाहरण होय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *