लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी-काळभोर परिसरात कुणी कसल्याही अडचणीत असेल अथवा बेवारस उन्हात तडफडत असेल तर मदतीला धावणारा देवमाणूस अर्थात राम,गेल्या काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्याची उष्णता यात रस्त्याच्या कडेला एक वयस्कर व्यक्ती निपचित पडलेली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांना मिळाली त्यांनी याची माहिती राम भंडारी यांना कळवली यावर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले.
रस्त्यावरील ती व्यक्तीची पाहणी केली असता ती मृत असल्याचे जाणवल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य राम भंडारी आमन शेख तथा दीपक गिरी घटनास्थळी पोहोचून याची माहिती पोलिसांना कळवली, बीट मार्शल प्रशांत सुतार आणि योगेश पाटील तेथे पोहोचले. दरम्यान रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले.रुग्णवाहिका आल्यानंतर त्या वृध्दास ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
