थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] ग्रामीण भागावर महावितरण कडून अघोषित लोडशेडिंगची सवय लावून घेण्याची गरज निर्माण झाली असून अगोदरच उष्म्याने हैराण झालेल्या ग्रामीण भागावर ही लोडशेडिंगची धाड पडणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात अनेकवेळा विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे उपलब्ध विज आणि मागणी याचा ताळमेळ जुळवताना तारेवरची कसरत करावी लागत असून विजेची मागणी अधिक असलेल्या कालावधीत ही तुट भरून काढण्यासाठी महावितरण ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडित करत आहे त्यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे.
पुरवठा करणारे विज फिडरवर लोड आल्यावर लगेच विज पुरवठा खंडित करण्यात येतो.याचा परिणाम दिवसभरात अनेक वेळा विज खंडित होते.याची ग्रामीण भागातील नागरिकांकडून याची सवय करून घेण्याची तयारी करणे गरजेचे आहे.
