पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]    पूर्व हवेलीत गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू असून सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर न मिळणारा गॅस काळ्याबाजारात मात्र लगेच उपलब्ध होतो अशी परिस्थिती दिसून येत आहे यामुळे संबंधित गॅस कंपन्यांकडून त्यांनी नेमलेल्या वितरकांची सखोल चौकशी करण्याची मागणी या भागातील सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

एकेकाळी पूर्व हवेली मध्ये केवळ एकच गॅस वितरक असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना प्रतीक्षा यादी ठरवून दिलेली असायची त्यामुळे गॅस सिलेंडर मिळण्यास बराच कालावधी लागे. त्यानंतर गॅस कनेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गॅस उत्पादक कंपन्यांकडून नवनवीन वितरक नेमण्यात आले त्यामुळे पूर्व हवेली बरेच गॅस वितरक उदयास आले सध्या वापरातील गॅसमध्ये घरगुती व व्यावसायिक असे दोन प्रकार करण्यात आल्याने घरगुती वापराचा गॅस तसेच व्यावसायिक वापराचा गॅस याच्या दरामध्ये बरीच तफावत असल्याने काळ्याबाजाराला मुभा निर्माण झाली अनेक छोटे मोठे व्यावसायिक सर्रासपणे घरगुती वापराचा गॅस व्यवसायासाठी करताना दिसतात यावर वितरण व्यवस्था कधीही कारवाई करताना दिसत नाही याचा परिणाम मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरच्या काळ्याबाजारात वाढ झाली.पुणे शहरालगत वाढलेली नागरी वस्ती याचा फायदा उचलला जातो आहे.

या वितरकांकडून सध्या गॅस सिलेंडर विक्रीची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे असे दिसून येते सर्वसामान्य ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे संबंधित याच उत्पादक कंपन्यांकडून आदेश असताना देखील याकडे अनेक वेळेला दुर्लक्ष केले जाते परंतु काळ्याबाजाराने विक्री होत असलेल्या भागात मात्र हा गॅस सहज उपलब्ध होतो हेच चित्र सध्या दिसत आहे घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरून तो विक्री करण्याचा मोठा व्यवसाय काही भागात चालू असल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे या भागातील संबंधित गॅस वितरक यांची सखोल चौकशी करून यातील गोड बंगाल बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

एखाद्या ग्राहकाला गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर त्यासाठी ऑनलाईन नंबर लावावा लागतो परंतु काळ्याबाजारात तो सहज उपलब्ध होतो यावर देखील उत्पादक कंपन्यांकडून चौकशीची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *