पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) मोबाईल टॉवरचे साहित्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना लोणीकाळभोर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 50 किलो केबल मधील तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.
लोणीकाळभोर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडीतील थेऊरफाटा येथील इंडस टॉवरच्या केवल बॅटरी व इतर साहित्य दि. ०३/०३/२०२३ रोजी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी झाल्याची तक्रार दाखल केलेली आहे.
गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांना सूचना दिल्या यावर एक तपास पथक तयार करण्यात आले,तपास पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ‘लोणी काळभोर पोलीस ठाणे परीसरामधील मोबाईल टॉवरचे केबलची चोरी करणारा व्यक्ती हा एच.डी.एफ.सी बैंक, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथे येणार आहे त्यावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार
अमित गोरे पोलीस उपनिरिक्ष, लोणी काळभोर पोलीस स्टेशन व तपासपथकातील स्टाफ यांचेसह एच.डी.एफ.सी बँकचे पाठीमागे, मोकळ्या जागेत, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथे सापळा रचुन थांबून असताना तो व्यक्ती येथे आला त्यावेळी वरील पथकाच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन चौकशीत त्याचे नाव अतिश राजु साठे, वय १९ वर्षे धंदा मजुरी, रा. वेताळबाबा वसाहत, गणपती मंदिराचे पाठीमागे, हडपसर, गाडीतळ, पुणे असे असल्याचे सांगीतले. दाखल गुन्हामध्ये त्याचेकडे कसुन तपास केला असता त्यांनी लोणी काळभोर परीसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे मोबाईल टॉवरचे केवल व इतर साहित्यांची चोरी त्याचे इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे अटक आरोपीताचे मदतीन त्याचे सहकारी १) प्रशांत मच्छींद्र वारे वय २५ वर्षे रा सध्या फ्लॅट नं ३०३, बिल्डींग नं बी-०६, अंतरिद्वा हौसिंग सोसायटी, नेहरुनगर, – पिंपरी पुणे मुळ कोपटी, ता शिरुरकासार जि बीड २) अखिलेश रामचंद्र गौतम वय २३ वर्षे धंदा- भंगार व्यवसाय रा सध्या चारवाडा, मांजरी बु. धांदडे यांचेकडे भाडयाने हडपसर, पुणे मुळ रा- सिद्धार्थनगर, इटवा उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून ३०,०००/- रू किंमतीचे ५० किलो ग्रॅम वजनाच्या मोबाईल टॉवरच्या केबलमधील तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितिन गायकवाड, सुदर्शन बोरावके,.सतिश सायकर, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देवीकर, दिगंबर जगताप पोलीस शिपाई निखिल पवार, दिपक सोनवणे, चक्रधर शिरगीरे, शैलेश कुदळे, बाजीराव वीर यांचे पथकाने केली आहे.
