पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अलिकडे संजय राऊत हे पक्षाचे कमी पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याप्रमाणेच वागत आहेत उध्दव ठाकरे यांना एकट पाडण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचा घणाघात त्यांनी केला तर येत्या 10 जुन पर्यंत ते राष्ट्रवादीवाशी झालेले असतील असे ते म्हणाले.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीनंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते परंतु हे राजीनामा नाट्य काही दिवसात शमल त्यानंतर यावर अनेक तर्कवितर्क उमटू लागले त्यातच संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे भाष्य केल्याने यात आणखीन रंग भरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *