पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल घडत आहेत. ऐन उन्हाळ्यात राज्यातील विविध भागात पावसाळ्यात नद्यांना पूर यावा तसा पूर आल्याचे दिसून येत आहे.पण चर्चा तर होते ती लाईटचीच, कारण पाऊस पडण्याची चाहूल लागताच घरातील विज गुल होते तर आकाशातील कधी कोसळेल याची कल्पनाच नसते त्यामुळे अवकाळी पाऊसाने वीज हळवी झाली की काय अशीच काही चर्चा रंगत आहे.
गेल्या महिन्याभरात राज्याच्या वेगवेगळ्या भागात विज कोसळून अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत कधी नव्हे इतके हे अपघात घडले आहेत त्यामुळे नागरिकांत विजेची दहशत निर्माण झाली आहे.परंतु अनेकवेळा वादळ नसताना मात्र घरातील विज पुरवठा खंडित होतो.आणि पाऊस थांबला की लगेच आगमन होते.
यावरून एक गोष्ट लक्षात येते की,पावसाळा पूर्व कामे अपूर्ण असल्याने फिडर खंडित होतात त्यामुळे ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागते.काहीच दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे त्या अगोदर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.
