लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमुह] जनहित सोशल फाऊंडेशन [Janhit social Foundation] लोणी-काळभोर यांच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राभिमान पुरस्कार सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन येत्या मंगळवारी दि.2 मे रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणी-काळभोर येथील संभाजीनगर येथे एंजल हायस्कूल शेजारील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आहेत. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे.तसेच मंगेश चिवटे,रामचंद्र साबळे,कु.प्रतिक्षा बागडी आणि हभप शिवाजी महाराज मोरे यांचा महाराष्ट्राभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार राहुल कुल,आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे,एम आय टी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे संचालक राहुल कराड उपस्थित राहणार आहेत.
