थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने आज सकाळीच पूर्व हवेलीतील अनेक गावांत जोरदार हजेरी लावली त्यामुळे गृहीणीसह सगळ्यांचीच धावपळ उडाली.

उकाड्याने बेहाल झालेल्या पूर्व हवेलीतील नागरिकांना आज सकाळीच पावसाने हजेरी लावून हवेत गारवा निर्माण केला.सकाळी साडे आठ वाजताच अचानक आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली.थेऊरसह कोलवडी,कुंजीरवाडी,लोणीकाळभोर, नायगाव आदी गावांत पाऊस पडला.

पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले होते.तर बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *