पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे अहमदनगर महामार्गावर डम्परने दुचाकीवरील दाम्पत्यांना ठोकरल्याने त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वाघोली येथील केसनंद फाटा येथे हा अपघात घडला असून काल दुपारी हा अपघात घडला. डम्परने काही अंतरापर्यंत दुचाकीसह दाम्पत्याला फरफटत नेले.

अशोक मार्तंड काळे आणि वर्षा अशोक काळे अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर अपघातानंतर चालक भास्कर पंढरीनाथ कंद हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक काळे आणि त्यांची पत्नी हे बाईकवरून वाळकी या त्यांच्या गावी कामानिमित्त चालले होते. वाघोली येथील केसनंद फाट्याकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक देत काही अंतर फरफटत नेले.

काळे हे काही दिवसापूर्वीच पोलिस दलातून निवृत्त झाले होते आणि सध्या गावी शेती व्यवसाय करत होते.

वाघोली भागात खडी, क्रश वाहतूक करणार्‍या डंपर चालकांची मुजोरी वाढली असून क्षमतेपेक्षा किती तरी अधिक वजनाची वाहतूक केली जात आहे यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कसलीच कारवाई होत नाही याचे नेमके काय कारण आहे हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *