पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) हदय रोग शस्त्रक्रियेमध्ये सतत येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे बेंटॉल सर्जरी ही पुण्यातील ग्रामीण भागात असलेल्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रथमच यशस्वीपणे करण्यात आली आहे. या मुळे एका रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी करणे अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ एक उदाहरण आहे. शहराच्या पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या कार्डियक टीम ने या रुग्णाला नवे जीवनदान देण्यास यशस्वी झाले आहे.

सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला तालुक्यातील महीम गावचे शेतकरी अर्जुन रामदास चौगुले (वयः ४७) यांच्या हदयाच्या झडपेतून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पोहचविणारी धमनी कमकुवत झाली होती. तिचा आकार ३ सेमी पासून वाढत जाऊन ८ सेमी पर्यंत पोहचला होता. रुग्णाला ब्लडप्रेशन असल्यामुळे ही फुटण्याची भिती अधिक होती. तसेच हदयाची झडप वॉल काम करीत नव्हते, त्यामुळे दबाव वाढतच चालला होता. त्यातच रक्ताची गुठळी तयार होऊन ती शरीरात कुठेही जाण्याची भिती निर्माण झाली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता विश्वराज हॉस्पिटलच्या कार्डिक विभागाने तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

प्रख्यात हदयरोग शल्यचिकित्सक डॉ. सूरज चव्हाण व हदयरोग तज्ञ डॉ. सूरज इंगोले यांच्या पथकाने रुग्णाची सर्व तपासणी केल्यानंतर त्यांची किडणी व लिवरची तपासणी केली. रूग्णाचेे ब्लड प्रेशर नियंत्रित केले. नंतर डॉक्टरांच्या अथक १४ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवे जीवन दिले. डॉक्टरांच्या या पथकात भूलतज्ञ डॉ. संग्राम घाडगे, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. विजय खंडाळे आणि डॉ संचिन कतकडे यांचा समावेश होता.विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, मुख्य व्यवस्थापक डॉ. सुधीर चंद्राउत्तम आणि व्यवस्थापकीय अधिकारी डॉ. तबरेज पठाण यांनी डॉक्टरांच्या सर्व पथकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुरज इंगोले यांनी सांगितले की,“ बेंटॉल शस्त्रक्रियेचा शोध ७ वर्षापूर्वी लागला आहे. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया असून अतिशय गुंतागुंतीची असते. यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार घेतल्यास १० वर्षापर्यंत रुग्णाला काही अडचण येत नाही. ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने यातील ४० टक्के रुग्ण दगाविण्याची भिती अधिक असते. रुग्णाला सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात अशावेळी जर रक्तदाब अनियंत्रित असेल तर यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळेच प्रथम पहिले दोन तीन दिवस रक्तदाब नियंत्रणात ठेवून ही जटील शस्त्रक्रिया करून पुढील तीन चार दिवस रुग्णावर डाॅक्टरांच्या निगराणीखाली ठेवावे लागते.”

या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे जेनेटिक नुसार, झडप लिक होणे, व्यक्तीला दम लागणे व थकवा अधिक लागणे, धडधड वाढते आणि त्यातुनच नस फुटण्याची भिती अधिक वाढते. या संबंधीची तपासणी केल्यानंतर रुग्णाला हा आजार आहे का नाही हे कळते. हा आजार मुख्यता वयवर्षे २० पासून कोणत्याही वयापर्यंत होत आहे. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हा आजार अधिक होण्याची संभावना आहे. शस्त्रक्रियेनंतर ही २ टक्के रुग्णांना पुन्हा हे होण्याचे प्रमाण आहे.

डॉ. अदिती कराड म्हणाल्या,“ गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉ. चव्हाण यांनी रुग्णाला जीवनदान दिले आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांचा वापर करून रूग्णांना परवडणारी सेवा देणे हेच आमचे कर्तव्य आहे.भविष्यात आपल्या रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी परवाणगी मिळविण्याची प्रक्रिया चालू असून लवकरच ही सेवा उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *