थेऊर. [हवेलीनामा वृत्तसमूह] हवेली तालुका कृषी अधिकारी व कृषी विभाग,पंचायत समिती हवेली जिल्हा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने येत्या खरीप हंगाम 2023 साठी हवेली तालुक्यातील सर्व परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांचे हंगामपूर्व कृषी निविष्ठा विक्रेते प्रशिक्षण हे नुकतेच ग्रामपंचायत सभागृह, ग्रामपंचायत पंचायत कार्यालय लोणीकाळभोर येथे आयोजित करण्यात आलेले होते .
या प्रशिक्षणांतर्गत बियाणे, खते, कीटकनाशके यांचे कायद्यातील महत्वपूर्ण तरतुदी सोबत निविष्ठांच्या बाबत पुरवठा व विक्री इतर अनुषंगिक बाबी याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.यावेळी मारुती साळे तालुका कृषी अधिकारी,हवेली, सुमित शिंदे कृषी अधिकारी,पंचायत समिती हवेली, गुलाबराव कडलग मंडळ कृषी अधिकारी,हडपसर, मेघराज वाळुंजकर कृषी पर्यवेक्षक, योगेश काकडे निविष्ठा विक्रेते यांचे प्रतिनिधीसह तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.
