पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]    बंगलोर स्थित आर्ट ऑफ लिविंग येथे आध्यात्मिक विश्वगुरु श्री श्री रविशंकर गुरुंच्या भेटीमध्ये 2004 मध्ये लक्ष्मीतरु या बहुउद्देशीय वृक्षाची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्याप्रमाणात करण्याचा संकल्प केल्यानंतर आजपर्यंत पाच लक्ष लागवड झाली असून देशांमध्ये 10 लाख वृक्ष लागवड झाली आहे.

लक्ष्मीतरु या झाडाच्या नावाप्रमाणेच या झाडापासून विविध प्रकारच्या दैनंदिन उपयोगी उत्पादने तयार करण्यात येत असून शाश्वत फाऊंडेशन शिंदेवाडी, हिंगणगाव येथील गायरान जमिनीवर लागवड करण्यात आलेल्या वृक्षापासून पहिल्यांदाच उपलब्ध झालेल्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या 101 लिटर तेल नुकतेच श्री गुरुदेवांच्या आसिम कृपेने केरळ स्थित तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात येथे दीपोत्सवासाठी शाश्वत फाऊंडेशनचे सुरेश पलुसकर, प्रभाकर जगताप,रघुनाथ हरपळे,शरद पुजारी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले,इतकेच नाही तर या यात्रेदरम्यान तामिळनाडूतील जगप्रसिद्ध असलेले सुमारे 2000 वर्षे पुरातन मंदिर असलेल्या सुचिंद्रम मंदिरातील आवारात प्रभाकर जगताप तथा रघुनाथ हरपळे तसेच मंदिर देवस्थानचे कर्मचारी यांच्या हस्ते लक्ष्मीतरु वृक्ष लागवड करण्यात आली.त्याच प्रमाणे केरळ येथील जगप्रसिद्ध गुरुवायूर येथील नटखट गोपालस्वामी मंदिरातील लक्ष द्विप प्रज्वलित करण्यात येतात त्यातही हे लक्ष्मीतरु बीज तेल अर्पण करण्यात आले.आणि भगवान कृष्ण भगवान यांचे आशीर्वाद घेऊन पुढील कार्यास प्रारंभ केला.

 

सध्या लक्ष्मीतरु पासून शेतीसाठी ऑरगॅनिक खत, दिव्यासाठी तेल, मेणबत्ती, फर्निचर विविध प्रकारच्या पेस्टमध्ये क्रीम तसेच विविध आजारावर औषधे अशी 24 प्रकारचे उत्पादने तयार करण्यात येत आहेत.

शाश्वत विकास फाउंडेशनचे सदस्य तथा श्रीहरी सेंद्रिय गटाचे कार्यवाहक नुकतेच श्री सद्गुरूना बंगलोर येथे भेटले दिव्य दर्शन योगा दरम्यान त्यांनी सांगितले की,”मी स्वःत या झाडाची बहुविध उपयोगिता शेतकरी व इतर सर्वांना समृध्द करते म्हणूनच याचे नामकरण लक्ष्मीतरु असे केले आहे.”याप्रसंगी श्री सुरेश पलुसकर, प्रभाकर जगताप,विनय मोरे,राज पवार यांनी लक्ष्मीतरुच्या सर्व उत्पादनांची माहिती देऊन,सन २०२३-२४ मध्ये ५लक्ष लागवडीचे उद्दिष्ठ असल्याचे सांगितले व याबाबत प्रभाकर जगताप यांच्या शिंदेवाडी गावातील श्री श्री सेंद्रीय गट,शाश्वत विकास फाऊंडेशन,आॅरगॅनिक श्री श्री,या संस्थाअनेक लोकोपयोगी योगदान करीतआहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *