पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर) तब्बल एकोणीस वर्षानंतर होऊ घातलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला रंग चढू लागला असून गावपातळीवर याची चर्चा रंगताना दिसून येत आहे.यामध्ये सहकार आघाडी व ग्रामपंचायत आघाडी अशा दोन महत्त्वपूर्ण गटात निवडणुक होत असून यात दिग्गज आपली ताकद पणाला लावून यात उतरले आहेत.

गेल्या संचालक मंडळाचा अनागोंदी व सुमार कारभारानंतर निवडणुक प्रक्रियाच घेण्यात आली नाही आणि जवळपास अठरा वर्ष प्रशासकीय कारभार चालू होता.परंतु अलिकडेच यावर संचालक मंडळ निवडीचा कार्यक्रम घोषित होताच सर्वच यात ताकदीने उतरले यात एकुणच पक्षनिष्ठा वगैरे सर्व बाजुला ठेवुन आपला हेतू साध्य कसा होईल याच पध्दतीने व्यूह रचना करण्यात आली.

तसा हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ परंतु प्रत्येकालाच आपण यात असावे असा प्रण घेतल्याने पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतर आपापली भूमिका मांडत उघड नाराजी बोलून दाखविण्यापर्यंत काहींनी भूमिका मांडली.खरतर सर्वांनाच संधी देता येत नाही तरीही सामंजस्यपणा अपेक्षित असतोच,राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल उमेदवार जाहिर झाल्यानंतर अनेक घडामोडी घडत गेल्या तर त्याच्या समोर आव्हान देणारा एक पॅनल अगोदरच तयार झाला आहे त्यामुळे या रणधुमाळीत कोण बाजी मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून गावात मोठ्या वजनदार गाड्यांची रेलचेल वाढली आहे.सोसायटी सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून मतदार आपलासा करण्यासाठी चंग बांधण्यात पदाधिकारी गर्क झाले आहेत.प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मोठा घोडेबाजार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.बाजारभाव मोठा असेल अशीही चर्चा आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *