पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व लोणीकंद या दोन्ही पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही काळात अवैध धंद्यना सुगीचे दिवस आले असून शहर पोलीसांत गेल्यावर यात कमी येण्याऐवजी दिवसेंदिवस यात वाढच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर प्रतिबंध कोणी घालाययाचा हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.सामाजिक स्वास्थ्य राखण्याची जबाबदारी गृह खात्यावर असताना देखील सगळीकडे अंधेर नगरी कशी? तरुणाई अवैध धंद्यांपाई कर्जबाजारी होत असून यामुळे गुन्हेगारी वाढत आहे.या अवैध धंद्यांवर सामाजिक विभाग नेहमीच कारवाई करतो परंतु पूर्व हवेलीत एवढ्या मोठ्याप्रमाणात चालू असलेल्या धंद्यावर कारवाई कधी होणार ?

केवळ कधीतरी जुजबी कारवाई करुन वेळ काढूपणा चालू आहे. यामुळे नागरीकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून दोन्ही पोलिस स्टेशन हद्दित मटका, सोरेट, चिमणी पाखरु, गावठी दारु भटट्या, अवैध बिअर बार मुळे ग्रामीण भागातील तरुणाई व्यसनाधिन झाली आहेत ही गावे शहरालगत असल्याने या भागातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे तरुण मुलांकडे पैसा मोठ्या प्रमाणावर आहे तसेच याभागात मजूरी काम करणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सोरट, मटका जोरात चालत असून लाखो रुपयांची उलाढाल या अवैध धंद्यात होत आहे गावातील तरुणाई बरोबरच वयस्करांना देखील याचा पुरता छंद जडला आहे त्यामुळे याभागातील तरुणांचा दिवस घिरट्या घालण्यात जात आहे.भर लोकवस्ती शाळांजवळ चौकात चाललेल्या मटका धंद्यावर शहर पोलिस कठोर कारवाई करुन या धंद्याना चाप लावणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून वाढत्या अवैध धंदे मटका जुगार चिमणी पाखरे सोरट तसेच मटका जुगारातील ओपन टू क्लोजचा हा खेळ थांबणार का?

लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील सोलापूर महामार्गावर तर लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दितील पुणे अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी लाॕजिंगवर खुलेआम वेश्या व्यवसाय चालू असून यामुळे गावांमधील वातावरण दूषित होत आहे परिणामी या सर्वच अवैध धंद्याच्या वर्चस्व वादातून गुन्हेगारी प्रवृती डोकेवर काढत आहे.

मटक्या बरोबरच चिमणी पाखरं (सोरट) यामध्ये लाखो रुपायची उलाढाल होत असून सोरटवाला जोमात आणि यावर पैसे लावणारा कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली असून जुगारातील अअनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत अशा धंद्यावर जुजबी कारवाई झाल्यानंतर लगेचच पुन्हा त्याच जागेवर दुप्पट जोमाने तो पुन्हा दुप्पट जोमात चालू होतो,सामाजिक विभाग कधीतरी एखादी कारवाई करून आपले अस्तित्व दाखवते परंतु याची परिणामकारकता काही दिवसापुरतीच असते.

भर लोकवस्ती चालू असलेले हे धंदे बिन्नदिक्तपणे सुरु असून याला नेमका आश्रय कोण देतय हा प्रश्न नागरीकांना पडला आहे सर्वसामान्य कुंटुंबातील मुले मटका जुगार खेळण्याच्या आहारी गेले असून दिवाळखोरीत निघत आहे तरुण पिढीला बरबादीच्या मार्गावर नेणारे या धंद्यावर कारवाई करुन ते कायमचे बंद होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.परंतु धंदे सतरा आणि कारभारी आठरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *