पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] तब्बल 20 वर्षांनंतर होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये वैध 195 उमेदवारी अर्जांपैकी 138 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम मतदार यादी आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रसिध्द केली जाणार असून, उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप देखील केले जाणार आहे.
यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विरोधात सर्वपक्षीय आघाडीने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणूकीत चांगलाच रंग भरणार आहे.पक्षाशी एकनिष्ठ यात बाजी मारणार की सर्वपक्षीय याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून आहे.
