पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अवकाळी पावसाने राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातला असून पूर्व हवेलीत देखील गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी मोठ्याप्रमाणात ढगांची गर्दी दाटून येत आहे काल शनिवारी असाच विजांचा कडकडाट चालू होता लोणी-काळभोर येथील एक तरुण शेतकरी आपल्या शेतात पिकांना पाणी देत असताना त्याच्या अंगावर विज कोसळून तो जागीच ठार झाला.
दीपक दशरथ काळभोर असे या घटनेत मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याचे नुकतेच लग्न झालेले होते या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित निधनाची नोंद करण्यात आली आहे.
दीपक शेतावर पाणी देण्यासाठी गेला परंतु बराच वेळ घरी परतला नाही त्यानंतर नातेवाईक शेतावर गेले असता तो जमिनीवर पडलेला दिसला,त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेले परंतु उपचारापूर्वीच तो मृत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
